मुंबई -कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे भारतात सध्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे क्रीडाविश्वातील अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. क्रिकेटमधील आयपीएलही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अनेक आजी-माजी क्रिकेटपटू आपल्या कुटुंबीयांसमवेत वेळ घालवत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्नीकडून हेअरस्टाईल करून घेतली होती. आता कपिल देव यांनीही या लॉकडाऊनदरम्यान एक भन्नाट लूक केला आहे.
कपिल देव यांनी केला भन्नाट 'लूक'... पाहा फोटो - Kapil Dev's abandoned look in lockdown news
भारताला पहिला विश्वकरंडक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी लॉकडाऊन काळात एक वेगळाच लूक केला आहे. त्यांच्या या लूकवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारताला पहिला विश्वकरंडक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी लॉकडाऊन काळात एक वेगळाच लूक केला आहे. त्यांच्या या लूकवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहा कपिल देव यांचा नवीन लूक -
१९९४मध्ये कपिल देव यांनी आपल्या १६ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. विशेष म्हणजे कपिल देव हे त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीतील १८४ डावात कधीच बाद झाले नाहीत. क्रिकेटच्या इतिहासात ५०००हून अधिक धावा आणि ४००हून अधिक बळी टिपणारे ते एकमेव अष्टपैलू खेळाडू आहेत. ११ मार्च २०१० रोजी कपिल देव यांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले. त्यांनी गॉड्स डिक्री', 'क्रिकेट माय स्टाईल', 'स्ट्रेट फ्रॉम द हार्ट', अशी तीन पुस्तके लिहिली आहेत. कपिल देव यांच्या जीवनावरही एक चित्रपट येणार असून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने त्यांची भूमिका साकारली आहे.