महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 21, 2019, 10:45 AM IST

ETV Bharat / sports

क्रिकेटनंतर कपिल देव यांनी पटकावले 'या' खेळाचे जेतेपद

६० ते ६४ वर्षाच्या वयोगटात त्यांनी ही किमया केली आहे. या स्पर्धेत १०० पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. दोन्ही दिवस पाऊस पडल्यामुळे हा खेळ खेळणे कठीण झाले होते. जेतेपद पटकावल्यावर कपिल देव म्हणाले, 'जिंकणे नेहमीच चांगले असते. आमच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंसाठी खेळण्याची संधी मिळणे भाग्याचे आहे. त्यामुळे आता आमच्यातही प्रतिस्पर्धी असल्याची भावना जागृत होत आहे.'

नवी दिल्ली -क्रिकेटमदध्ये कमाल केल्यानंतर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी गोल्फमध्येही आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. भारताला पहिला विश्वचषक मिळवून दिलेल्या कपिल देव यांनी एवीटी चॅम्पियन्स टूर गोल्फ टूर्नामेंटचे जेतेपद आपल्या नावावर केले आहे.

हेही वाचा -आफ्रिदीचा जावईशोध; म्हणाला म्हणून लंकेच्या खेळाडूंचा देशात खेळण्यासाठी नकार

६० ते ६४ वर्षाच्या वयोगटात त्यांनी ही किमया केली आहे. या स्पर्धेत १०० पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. दोन्ही दिवस पाऊस पडल्यामुळे हा खेळ खेळणे कठीण झाले होते. जेतेपद पटकावल्यावर कपिल देव म्हणाले, 'जिंकणे नेहमीच चांगले असते. आमच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंसाठी खेळण्याची संधी मिळणे भाग्याचे आहे. त्यामुळे आता आमच्यातही प्रतिस्पर्धी असल्याची भावना जागृत होत आहे.'

कपिल देव

मार्चमध्ये या स्पर्धेचा पहिला टप्पा दिल्लीतील एनसीआरमध्ये तर, दुसरा टप्पा बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आला होता. अंतिम टप्पा जानेवारीत कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहे. कपिल देव यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत २२५ एकदिवसीय आणि १३१ कसोटी सामने खेळले आहेत.

कपिल देव यांची नुकतीच हरियाणा स्पोर्ट्स विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे. हरियाणाचे युवा व क्रीडा मंत्री अनिल वीज यांनी याची माहिती ट्विट करून दिली. हरियाणा स्पोर्ट्स विद्यापीठ हे देशातील तिसरे क्रीडा विद्यापीठ आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details