महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी छोट्या तैमुरला दिली खास बॅट, पाहा व्हिडिओ - ऑटोग्राफ

करीनाने कपिल देव यांच्याकडे एका बॅटवर ऑटोग्राफची मागणी केली.

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी छोट्या तैमुरला दिली खास बॅट, पाहा व्हिडिओ

By

Published : Aug 12, 2019, 5:57 PM IST

मुंबई -बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर नेहमी चर्चेत असतो. भारताचे दिग्गज आणि माजी कर्णधार कपिल देव यांच्यामुळे तो परत चर्चेत आला आहे. कपिल देव यांनी छोट्या तैमुरला एक खास बॅट भेट म्हणून दिली आहे.

अभिनेत्री करीना कपूर खान ही एका डान्सच्या रिअॅलिटी शोमध्ये जज आहे. त्या शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कपिल देव यांना बोलवण्यात आले होते. तिथे करीनाने आपल्या मुलासाठी म्हणजेच तैमूरसाठी एक इच्छा बोलून दाखवली. करीनाने कपिल देव यांच्याकडे एका बॅटवर ऑटोग्राफची मागणी केली.

कपिल देव यांनी लगेचच करीनाची ही इच्छा पूर्ण केली. त्यांनी बॅट आणि चेंडूवर आपला ऑटोग्राफ दिला. या अनोख्या भेटीमुळे करीना खुप खूश झाली. यापूर्वी, करीनाने तैमुरबद्दल असे म्हटले होते की, 'तैमूर हा आपल्या 'आजोबांसारखाच क्रिकेटर झाला पाहिजे.'

कपिल देव यांनी दिलेल्या या भेटीबद्दल करीना म्हणाली, 'माझ्या मनात ही इच्छा आहे की तो कदाचित क्रिकेटपटू बनावा आणि यापेक्षा माझ्यासाठी चांगली भेट असू शकत नाही.'

ABOUT THE AUTHOR

...view details