ख्राईस्टचर्च - न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले. विल्यमसनचे हे कसोटी क्रिकेटमधील सलग तिसरे शतक ठरले. त्याने २०२० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात २५१ धावांची खेळी साकारली होती. यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दोनही कसोटी सामन्यात शतक झळकावले.
पाकिस्तानचा पहिला डाव २९७ धावांवर आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाअखेर ३ बाद २८६ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड दुसऱ्या दिवसखेर ११ धावांनी मागे आहे. टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल यांनी न्यूझीलंडला ५२ धावांची सलामी दिली. ब्लंडलचा (३३) अडथळा शाहीन शाह आफ्रिदीने दूर केला. यानंतर ब्लंडलची (१६) शिकार फहिम अशरफने केली. रॉस टेलर देखील अवघ्या १२ धावा काढून बाद झाला.
हेही वाचा -टीम इंडियाला दिलासा; वादानंतर संपूर्ण संघाचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह