महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

तब्बल १९ महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघात परतला 'हा' वेगवान गोलंदाज! - कमलेश नागरकोटीचे पुनरागमन

बीसीसीआयच्या ज्यूनियर संघनिवड समितीचे अध्यक्ष आशीष कपूर यांनी बांगलादेशमध्ये होणाऱ्या एमर्जिंग एशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. दुखापतीमुळे १९ वर्षीय नागरकोटीला आयपीएलच्या मागच्या हंगामात खेळता आले नव्हते. नागरकोटी हा आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळतो. मागच्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये राजस्थान संघाकडून त्याने आपला शेवटचा सामना खेळला होता.

तब्बल १९ महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघात परतला 'हा' वेगवान गोलंदाज!

By

Published : Oct 1, 2019, 10:20 AM IST

नवी दिल्ली -आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे प्रकाशझोतात आलेला युवा तेज गोलंदाज कमलेश नागरकोटी भारतीय संघात परतला आहे. आगामी एमर्जिंग एशिया करंडक स्पर्धेसाठी तब्बल १९ महिन्यांच्या विश्रांतीनंतर नागरकोटीचा टीम इंडियात समावेश केला आहे.

हेही वाचा -

बीसीसीआयच्या ज्यूनियर संघनिवड समितीचे अध्यक्ष आशीष कपूर यांनी बांगलादेशमध्ये होणाऱ्या एमर्जिंग एशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. दुखापतीमुळे १९ वर्षीय नागरकोटीला आयपीएलच्या मागच्या हंगामात खेळता आले नव्हते. नागरकोटी हा आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळतो. मागच्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये राजस्थान संघाकडून त्याने आपला शेवटचा सामना खेळला होता.

निवडलेला भारतीय संघ -

विनायक गुप्ता, आर्यन जुयाल, बीआर शरत (कर्णधार), चिन्मय सुतार, यश राठोड, अरमान जाफर, संवीर सिंह, कमलेश नागरकोटी, ऋतिक शौकीन, एसए देसाई, अर्शदीप सिंह, एसआर दुबे, कुमार सूरज, पी.रेखाडे, कुलदीप यादव.

ABOUT THE AUTHOR

...view details