नवी दिल्ली -न्यायमूर्ती दीपक वर्मा यांची दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डीडीसीएच्या वार्षिक बैठकीत (एजीएम) नवीन अध्यक्षपदासाठीची निवडणूक १३ जानेवारीला होईल, असा निर्णय घेण्यात आला. 'आमच्याकडे पाच मुद्दे होते. आम्ही सर्व अंमलात आणले आहेत. काही विषयांवर वादविवाद झाले पण कोणतीही चर्चा योग्य नाही', असे डीडीसीएचे संचालक संजय भारद्वाज यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
हेही वाचा -शोएब अख्तरची 'पलटी'...म्हणाला, 'मी तसं कधीच बोललो नव्हतो'