डरबन - ख्रिस गेल आणि इमरान ताहिर यांच्यानंतर अजून एका क्रिकेटरने आगामी विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू जे. पी. ड्यूमिनीने इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेनंतर वनडेतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
जे. पी. ड्यूमिनीने इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेनंतर वनडेतून होणार निवृत्त - ICC
दुखापतीमुळे ड्यूमिनीने मागचे काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब राहीला होता
JP Duminy
ड्यूमिनीने आपल्या निवृत्तीची घोषणा करताना म्हटले, की मी वनडे क्रिकेटमधून विश्वचषकानंतर निवृत्त होणार असलो तरी, दक्षिण अफ्रीकेसाठी टी-२० क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे. श्रीलंकेविरुध्दच्या ५ सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या २ सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकन संघात साडेचार महिन्यानंतर ड्यूमिनीला स्थान देण्यात आले आहे.
दुखापतीमुळे डुमिनीने मागचे काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब राहीला होता. याच दरम्यान त्याने आपल्या निवृत्तीचा विचार केला.