मुंबई - आयपीएलच्या १४व्या हंगामाला सुरूवात होण्याआधीच विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे. बंगळुरूचा यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिप याने आयपीएल माघार घेतली आहे. याची माहिती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे दिली.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जोश फिलिप याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिप्लेसमेंट म्हणून जोश फिलिपच्या जागी बंगळुरूने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज फिन एलनला याला संघात स्थान दिले आहे.
एलनला आयपीएल २०२१ साठी चेन्नईत झालेल्या मिनी लिलावात कुणीच खरेदी केलेले नव्हते. त्याची बेस प्राइस २० लाख होती. फिलिपच्या माघार नंतर घेतल्यानंतर बंगळुरूने ट्विट केले आहे. जोश फिलिपने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याचे सांगताना आम्हाला दुःख होत आहे. त्याची रिप्लेसमेंट म्हणून आम्ही फिन एलन याला करारबद्ध केले आहे. असे बंगळुरूने ट्विटमध्ये म्हटलं आहे.