केपटाऊन- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात यष्टीरक्षक जोस बटलरने आफ्रिकेच्या व्हर्नन फिलँडरनेला थेट शिव्याच घातल्या. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानात खेळवण्यात आला. सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंड संघाला विकेट घेण्यात यश मिळत नव्हते. तेव्हा जोस बटलरने व्हर्नन फिलँडरला यष्ट्यांमागून डिवचले. बटलरने सातत्याने अपशब्द वापरले तरीही फिलँडरनं यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. हे पाहून चिडलेल्या बटलरने फिलँडरला थेट शिव्याच घालल्या. तरीही फिलँडरने शांत राहून फलंदाजी सुरू ठेवली.
इंग्लंडच्या ४३८ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर आफ्रिकेने २ बाद १२६ अशी मजली मारली होती. अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात केशव महाराज (२), फाफ डु प्लेसी (१९), ज्यु. पीटर मालन (८४) हे झटपट बाद झाले. त्यामुळे आफ्रिकेची अवस्था ५ बाद १७१ अशी झाली. तेव्हा क्विंटन डी-कॉक आणि रासी वेन डर दुसान यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. दोघांनी तब्बल ४४ षटके खेळून काढली.