नवी दिल्ली - राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या १३व्या सत्रातील पहिला सामना जिंकला आहे. आज (रविवार) राजस्थान संघ आपला दुसरा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी खेळणार आहे. या सामन्यापूर्वी, राजस्थानला दिलासादायक बातमी मिळाली असून संघाचा धाकड यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर पंजाबविरुद्धचा सामान खेळण्यास सज्ज झाला आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी धाकड फलंदाजाची राजस्थानच्या संघात 'एन्ट्री' - बटलर क्वारंटाइन कालावधी
इंग्लंडचा क्रिकेटपटू जोस बटलरने आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे तो पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी राजस्थान संघात दाखल झाला आहे.
इंग्लंडचा क्रिकेटपटू जोस बटलरने आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे आणि आता तो हंगामातील आपला पहिला सामना खेळण्यासाठी उत्साहित आहे. सामन्यापूर्वी बटलर म्हणाला, "माझा पहिला सामना खेळण्यास मी उत्सुक आहे, खेळाडूंशी सराव करणे चांगले होते. संघाबरोबर एक सकारात्मक उर्जा आहे त्यामुळे मला मैदानात उतरण्याची खरोखरच उत्सुकता आहे.''
तो म्हणाला, ''संघाभोवतीची ऊर्जा चमत्कारिक आहे. पहिल्या सामन्यानंतर आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही सरावाचा आनंद घेतला. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध अत्यंत स्पर्धात्मक सामना अपेक्षित आहे.'' बटलरच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सने चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि स्टीव्ह स्मिथ ही सलामीची जोडी निश्चित केली होती. पण बटलरच्या पुनरागमनानंतर स्मिथ मधल्या फळीला बळकट करू शकतो. स्मिथ आणि सॅमसन यांनी पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती.