लंडन - इंग्लंड क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आपले योगदान दिले आहे. बटलर २०१९ विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात परिधान केलेल्या जर्सीचा लिलाव करणार आहे. या लिलावाद्वारे मिळणारा निधी तो कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देणार आहे.
वर्ल्डकप विजेता बटलर करणार जर्सीचा लिलाव, मिळालेला निधी कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी - जोस बटलर लेटेस्ट न्यूज
जुलै महिन्यात लॉर्ड्स येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जोस बटलरने इंग्लंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याने अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावले. शिवाय, सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या लढतीत शेवटच्या चेंडूवर मार्टिन गप्टिललाही धावबाद केले होते.
वर्ल्डकप विजेता खेळाडू बटलर करणार आपल्या जर्सीचा लिलाव
जुलै महिन्यात लॉर्ड्स येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जोस बटलरने इंग्लंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याने अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावले. शिवाय, सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या लढतीत शेवटच्या चेंडूवर मार्टिन गप्टिललाही धावबाद केले होते.
आपल्या सर्वांना माहित आहे की हॉस्पिटल, डॉक्टर, नर्स आणि एनएचएस (नॅशनल हेल्थ सर्व्हिस) यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांना येत्या काळात अधिकाधिक समर्थनाची आवश्यकता असेल, असे बटलरने सांगितले.