केपटाऊन -आपल्या कारकिर्दीत उत्तम क्षेत्ररक्षक असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने भारताच्या रवींद्र जडेजाला जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवडले आहे. र्होड्सने म्हटले, की जडेजा हा एक प्रतिबद्ध खेळाडू आहे आणि त्याच्याकडे अंदाज घेण्याची क्षमता उत्कृष्ट आहे. इंस्टाग्रामवर सुरेश रैनाशी बोलताना र्होड्सने आपली प्रतिक्रिया दिली.
र्होड्स म्हणाला, "जड्डूने (जडेजा) काही उत्तम झेल घेतले आहे. त्याच्या यशाचे रहस्य म्हणजे त्याचे समर्पण. चेंडूचा अंदाज घेण्याबद्दल तो पारंगत आहे. मला डिव्हिलियर्सची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहायला आवडते. मार्टिन गुप्टिलदेखील आहे. जड्डू देखील आहे. मायकेल बेव्हन देखील वेगवान खेळाडू होता.''