नवी दिल्ली -दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्षेत्ररक्षक आणि माजी खेळाडू जॉन्टी ऱ्होड्सची स्वीडन क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एका संकेतस्थळाच्या अहवालानुसार, स्वीडन क्रिकेट फेडरेशनने ही माहिती दिली आहे.
दिग्गज क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्स 'या' संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी - जॉन्टी ऱ्होड्स लेटेस्ट न्यूज
"मी माझ्या कुटुंबासमवेत स्वीडनमध्ये राहण्यास आणि स्वीडन क्रिकेट समुदायाबरोबर काम करण्यास इच्छुक आहे. ही योग्य वेळ आहे आणि मला नवीन वातावरणात माझी ऊर्जा जोडण्यास आवडेल," असे ऱ्होड्स ने सांगितले. ऱ्होड्स सध्या युएईमध्ये आहे, जिथे तो आयपीएल संघ किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम करत आहे.
"मी माझ्या कुटुंबासमवेत स्वीडनमध्ये राहण्यास आणि स्वीडन क्रिकेट समुदायाबरोबर काम करण्यास इच्छुक आहे. ही योग्य वेळ आहे आणि मला नवीन वातावरणात माझी ऊर्जा जोडण्यास आवडेल," असे ऱ्होड्सने सांगितले. ऱ्होड्स सध्या युएईमध्ये आहे, जिथे तो आयपीएल संघ किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम करत आहे.
स्वीडन क्रिकेट बोर्डाचे क्रीडा संचालक बेन हाराडीनेने म्हणाले, "युवा क्रिकेट आणि उच्च कामगिरीला पुढे नेणे हे आमचे उद्दीष्ट आहे. जॉन्टी ऱ्होड्स आमच्या खेळाडूंना पुढे नेण्यास आणि भविष्यासाठी एक चांगली प्रशिक्षण यंत्रणा तयार करण्यास सक्षम आहे. ऱ्होड्सला आमच्या छोट्या आणि महत्वाकांक्षी संघात समाविष्ट करून आम्हाला खूप आनंद झाला आहे."