नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू आणि निवृत्ती घेतलेला जोहान बोथा क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परतणार आहे. बोथा बिग बॅश लीगच्या (बीबीएल) आगामी हंगामात खेळणार असून होबार्ट हरिकेन्स संघात सामील होईल.
हेही वाचा -टीम इंडियाचा क्रिकेटपटू विजय शंकरची ईटीव्ही भारतशी खास मुलाखत
होबार्ट हरिकेन्स संघाने नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछानेच्या जागी बोथाचा समावेश केला आहे. काही दिवसांपूर्वी, लामिछाने कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे तो लगेच संघात उपलब्ध होणार नाही. बोथा याआधी २०१२ ते २०१४ या काळात अॅडलेड स्ट्रायकर्सकडून खेळला आहे. त्यानंतर २०१५ ते २०१८ पर्यंत सिडनी सिक्सर्सकडून खेळला होता.
३८ वर्षीय बोथाला २०१६मध्ये ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळाले आहे. तो स्थानिक खेळाडू म्हणून संघासाठी उपलब्ध असेल आणि पहिल्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असेल. बोथा पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) कराची किंग्जचा सहाय्यक प्रशिक्षकही होता.
बोथाने दक्षिण आफ्रिकेसाठी ५ कसोटी सामने, ७८ एकदिवसीय आणि ४० टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे १७, ७२ आणि ३७ विकेट्स घेतल्या आहेत.