महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विराट 'या' तारखेला होणार बाबा... जोफ्रा आर्चरचे ५ वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल! - virushka pregnancy and archers tweet

या ट्विटमध्ये ''जानेवारी ५'' असा उल्लेख करण्यात आला आहे. या दिवशी विराट आणि अनुष्काच्या घरी नवा पाहुणा येऊ शकतो, अशी चर्चा या ट्विटद्वारे नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. याआधी जोफ्रा आर्चरसंबंधी ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

jofra archers five year old tweet gone viral after anushka sharma announces her pregnancy
विराट 'या' तारखेला होणार बाबा...जोफ्रा आर्चरचे ५ वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल!

By

Published : Aug 30, 2020, 5:32 PM IST

दुबई -भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी गुरुवारी चाहत्यांना एक गोड बातमी दिली. अनुष्का शर्मा गर्भवती असून पुढच्या वर्षी जानेवारीत आम्ही पालक होऊ, असे विराटने सांगितले होते. या बातमीनंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे ५ वर्षांपूर्वीचे एक ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

या ट्विटमध्ये ''जानेवारी ५'' असा उल्लेख करण्यात आला आहे. या दिवशी विराट आणि अनुष्काच्या घरी नवा पाहुणा येऊ शकतो, अशी चर्चा या ट्विटद्वारे नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. याआधी जोफ्रा आर्चरसंबंधी ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मागील वर्षी आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान, आर्चरचे जुने ट्विट सोशल मीडियावर धूमाकूळ घालत होते. २०१४मध्ये आर्चरने पाऊस आणि सुपर ओव्हरसंबंधी ट्विट केले होते. आर्चरने इंग्लंडकडून ११ कसोटी, १४ एकदिवसीय आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. ज्यात त्याने ६३ बळी घेतले आहेत.

विशेष म्हणजे, आर्चरने नुकतीच पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती आणि आता तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details