Ashes Series :जोफ्रा आर्चर चमकला; 6 विकेट घेत ऑस्ट्रेलियाला केले गारद - अॅशेस मालिका
इंग्लडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने ऑस्ट्रेलियाची केविलवाणी अवस्था केल्याचे पाहायला मिळाली. आर्चरने 6 फलंदाजांना बाद करत केवल 45 धावा दिल्या आहेत.
जोफ्रा आर्चर
लीड्स- इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने ऑस्ट्रेलियाची केविलवाणी अवस्था केल्याचे पाहायला मिळाली. आर्चरने 6 फलंदाजांना बाद करत केवल 45 धावा दिल्या आहेत. त्याच्या उत्तम खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची अवस्था सर्व बाद 179 अशी झाली. पावसाच्या वारंवार व्यत्ययामुळे इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामन्यातील बराच वेळ वाया गेला होता.