महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हरवलेले पदक आर्चरला सापडले, शेअर केला फोटो - Jofra archer medal news

आर्चरने ट्विटरवरुन ही माहिती दिली. “शोध घेत अचानक बेडरूममध्ये हे पदक सापडले”,असे पदकाचा फोटो शेअर करताना आर्चरने म्हटले आहे.

Jofra archer finally got his lost world cup medal
हरवलेले पदक आर्चरला सापडले, शेअर केला फोटो

By

Published : Apr 27, 2020, 5:33 PM IST

लंडन - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला अखेर हरवलेले पदक सापडले आहे. आर्चरने ट्विटरवरून ही माहिती दिली. “शोध घेत अचानक बेडरूममध्ये हे पदक सापडले”, असे पदकाचा फोटो शेअर करताना आर्चरने म्हटले आहे.

इंग्लंडने न्यूझीलंडवर मात देत २०१९च्या विश्वकरंडक विजेतेपदाला गवसणी घातली. सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्याच्या थरारनाट्यात इग्लंडच्या जोफ्रा आर्चरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच जोफ्रा आर्चरचे विजेतेपदाचे पदक हरवले असल्याची माहिती समोर आली होती. नुकत्याच शिफ्ट झालेल्या घरात हे पदक सापडत नसल्याचे आर्चरने सांगितले होते.

मागील वर्षी जुलैमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत आर्चरने २० विकेट्स घेतल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details