महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रुट म्हणतोय . . . गे असणे चुकीचे काही चुकीचे नाही

गॅब्रियलच्या विधानावर रुटने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. दिवसअखेर रुट म्हणाला की, काही गोष्टी मैदानावर होत असतात त्या गोष्टी मैदानातच राहिल्या पाहिजे. काही लोक मैदानावर बोलत असतात त्यानंतर त्यांना पश्चाताप होतो, असे रुट म्हणाला.

जो रुट

By

Published : Feb 12, 2019, 11:31 PM IST

सेंट लुसिया - क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा असे काही बोलले जाते ज्यामुळे केवळ खेळाडूंमध्येच नव्हे तर दोन्ही संघाच्या संबंधात वैर निर्माण होते. विंडीज आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शॅनन गॅब्रियल आणि इंग्लंडचा कर्णधार यांच्यात बाचाबाची झाली. पण हे स्लेजिंग मर्यादेच्या बाहेर गेल्याच दिसून आले.

दोघात झालेली बाचाबाची स्टम्पच्या माईकमध्ये कैद झाली. त्यात गॅब्रियलचा आवाज कैद झाला नाही. रुटचा मात्र, आवाज कैद झाला. रुट म्हणाला की, याचा उपयोग अब्रुचे धिंडवडे उडविण्यासाठी करु नये. समलैंगिक असण्यात काही चुकीचे नाही.

गॅब्रियलच्या विधानावर रुटने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. दिवसअखेर रुट म्हणाला की, काही गोष्टी मैदानावर होत असतात त्या गोष्टी मैदानातच राहिल्या पाहिजे. काही लोक मैदानावर बोलत असतात त्यानंतर त्यांना पश्चाताप होतो, असे रुट म्हणाला.

पुढे बोलताना रुट म्हणाला, की हे कसोटी क्रिकेट आहे. शॅनन हा भावूक क्रिकेटर आहे. सामना जिंकण्यासाठी तो काहीही करू शकतो. तो चांगला खेळाडू असून फायटर क्रिकेटर आहे. या मालिकेत त्याने नावलौकिकास साजेशई कामगिरी केली आहे. त्याचा त्याला गर्व असेल असे रुट म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details