लंडन- पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर इंग्लंडचा संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लंडने आपल्या संघात कसोटी संघातील खेळाडूंची निवड केली आहे. महत्वाचे म्हणजे, टी-२० मालिकेसाठी स्फोटक फलंदाज ज्यो रुटची निवड करण्यात आलेली नाही.
यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांना टी-२० संघात स्थान मिळाले आहे. तर रुट आणि वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स यांची वर्णी एकदिवसीय संघात लागली आहे. वेगवान गोलंदाज सॅन कुरेन याला इयॉन मार्गनने दोन्ही संघात जागा दिली आहे.
बेन स्टोक्स संघाबाहेर आहे. त्याने कौंटुबिक कारण देत पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. बेनचे वडिल असून आजारी त्यामुळे तो न्यूझीलंडला गेला आहे. सलामीवीर जेसन रॉय दुखापतीमुळे टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. पण तो ११ सप्टेंबरपासून होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात वापसी करु शकतो.
इंग्लंड संघाचे निवडकर्ता अॅड स्मिथ यांनी सांगितले की, आम्ही टी-२० विश्वकरंडकाच्या तयारीसाठी संघाची बांधणी करत आहोत.