महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जो रुटने १६ वर्षाचा रेकार्ड मोडत केला 'हा' विश्वविक्रम; पॉन्टिंगला टाकले मागे - semifinal

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जो रुटने एक विश्वविक्रम केला आहे. हा विक्रम म्हणजे, त्याने विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधीक झेल घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात रुटने पॅट कमिन्सचा झेल घेत हा विक्रम केला. दरम्यान, हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावे होता.

जो रुटने १६ वर्षाचा रेकार्ड मोडीत काढत केला 'हा' विश्वविक्रम; पॉन्टिंगला टाकले मागे

By

Published : Jul 11, 2019, 11:09 PM IST

बर्मिंगहॅम- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जो रुटने एक विश्वविक्रम केला आहे. हा विक्रम म्हणजे, त्याने विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधीक झेल घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात रुटने पॅट कमिन्सचा झेल घेत हा विक्रम केला. दरम्यान, हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावे होता.

विश्वकरंडक स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया विरुध्द यजमान इंग्लंडच्या संघात झाला. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून एकतर्फी पराभव केला. याच सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जो रुटने सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम केला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर होता. २००३ साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत पॉन्टिंगने ११ झेल पकडले होते. हा विक्रम रुटने या विश्वकरंडकात मोडला. रुटने आतापर्यंत १२ झेल पकडले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details