लंडन - विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शेवटपर्यंत झुंज देऊनही न्यूझीलंडचा सुपर ओव्हरच्या निकषानुसार पराभव झाला. या पराभवाने न्यूझीलंडचे खेळाडूंना कमालीचे दुःख झाले. तेव्हा न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी निशनने निराश होत ट्विट केले आहे. त्या ट्विवटमध्ये त्याने एक भावूक संदेश दिला. तो म्हणतो, 'मुलांनो खेळांमध्ये करिअर करु नका, जमल्यास बेकरीत काम करा. अन्यथा काहीही करा आणि सुखाने ६० वर्ष जगून जगाचा निरोप घ्या'. अशा आशयाचे भावूक ट्विट निशमने केले आहे. तसेच निशमने आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे.
बेकरीत काम करा, पण खेळ खेळू नका; पराभवानंतर दुःखी खेळाडूचा संदेश - wc final
'मुलांनो खेळांमध्ये करिअर करु नका, जमल्यास बेकरीत काम करा. अन्यथा काहीही करा आणि सुखाने ६० वर्ष जगून जगाचा निरोप घ्या'. अशा आशयाचे भावूक ट्विट निशमने केले आहे.

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर रविवारी विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. अंतिम लढतीत यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघांनी जबरदस्त खेळ केला आणि शेवटच्या चेंडूवरही लढत बरोबरीत सुटली. त्यामुळे निकालासाठी सुपरओव्हर खेळवण्यात आली. पण सुपरओव्हरमध्येही दोन्ही संघातील बरोबरी कायम राहिली. तेव्हा अखेर सामन्यातील चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेते घोषीत करण्यात आले.
शेवटच्या क्षणाला विजयाने पाठ फिरवल्याने न्यूझीलंडचे खेळाडू दुःखी झाले. या दुःखातून जिमी निशमने ट्विट केले आहे. त्याने चाहत्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. तसेच त्याने तुमचे स्वप्न पूर्ण करु शकलो नाही, असे सांगत चाहत्याची माफी मागितली आहे. याच ट्विटमध्ये त्याने विजयी इंग्लंडच्या संघाला शुभेच्छाही दिल्या आहेत.