नवी दिल्ली -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव (बीसीसीआय) जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) अध्यक्षपदी निवड झाली आहे. जय शाह यांनी बांगलादेशच्या नजमुल हसन यांची जागा घेतली.
बीसीसीआयचे खजिनदार अरुणसिंग धुमाळ यांनी ही माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत लिहिले की, जय शाह यांचे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन. मला खात्री आहे की, त्यांच्या नेतृत्वात एसीसी अधिक उंची गाठेल आणि सर्व आशियाई प्रदेशातील क्रिकेटपटूंना त्यांचा फायदा होईल. यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा.