लाहोर -पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी देशातील क्रिकेटच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ''या खेळाचे मैदान हादरले आहे आणि आता येथे सर्व काही घडत आहे, जे जगात कुठेही घडत नाही'', असे मियांदादने म्हटले.
पाकिस्तान क्रिकेटची मियांदाद यांना चिंता; म्हणतात, जगात असे कुठेही घडत नाही - miandad is worried about cricket
मियांदाद म्हणाले, "मला पाकिस्तान क्रिकेटच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याची इच्छा नाही. बोर्ड जे काही करत असेल, ते चांगले की वाईट हे काळच ठरवेल. मला आशा आहे, की सर्व काही ठीक होईल.''
पाकिस्तान क्रिकेटची मियांदाद यांना चिंता; म्हणतात, जगात असे कुठेही घडत नाही
मियांदाद म्हणाले, "मला पाकिस्तान क्रिकेटच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याची इच्छा नाही. बोर्ड जे काही करत असेल, ते चांगले की वाईट हे काळच ठरवेल. मला आशा आहे, की सर्व काही ठीक होईल. गेल्या २० वर्षात आपल्या देशात क्रिकेटबद्दल बरेच काही बदलले आहे. आता ज्या प्रकारचे क्रिकेट घडत आहे ते पूर्वीसारखे नव्हते. संपूर्ण जगात या खेळात कोणताही बदल केला गेला नाही, पण आपल्या देशात असे होत आहे."
मियांदादने पाकिस्तानकडून १२४ कसोटी आणि २३३ एकदिवसीय सामने खेळले आहेत.