दुबई -मुंबई इंडियन्सचा फलंदाज कायरन पोलार्डने संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहची स्तुती केली आहे. जसप्रीत बुमराह हा जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू असून त्याने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे, असे पोलार्डने सांगितले. मलिंगाने कौटुंबिक कारणांमुळे आयपीएल-२०२०मधून माघार घेतली आणि त्याच्या अनुपस्थितीत बुमराहने वेगवान गोलंदाजीचा मुख्य सूत्रे सांभाळली आहेत.
जसप्रीत बुमराह मलिंगाचा वारसदार, स्फोटक फलंदाजाचे मत - जसप्रीत बुमराह लेटेस्ट न्यूज
बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत. रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर पोलार्ड म्हणाला, "बुमराह हा एक जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे. बर्याच काळासाठी तो अव्वल स्थानी असलेला गोलंदाज आहे. आता बुमराहने मलिंगाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.''
बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत. रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर पोलार्ड म्हणाला, "बुमराह हा एक जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे. बर्याच काळासाठी तो अव्वल स्थानी असलेला गोलंदाज आहे. त्याने बरेच काही शिकले आहे आणि मुंबई इंडियन्समध्ये तो आणखी पुढे गेला आहे. आमचा त्याच्यावर विश्वास आहे. काही वर्षांपूर्वी आमच्याकडे तंदुरुस्त मलिागा होता. आता बुमराहने मलिंगाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.''
रविवारी आयपीएलमध्ये एकाच सामन्यात दोन सुपर ओव्हर्स खेळवण्यात आल्या. यात पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बुमराहने फक्त पाच धावा दिल्या. मात्र, दुसऱ्या सुपर ओव्हरच्या लढतीत पंजाबने मुंबईला पराभूत केले.