महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

VIDEO: रोहितची लाडकी लेक करतेय, बुमराहच्या बॉलिंग अ‌ॅक्शनची कॉपी - रोहितची लाडकी लेक करतेय, बुमराहच्या बॉलिंग अ‌ॅक्शनची कॉपी

बुमराहने शेअर केलेल्या व्हिडिओत, रोहित शर्मा आणि तिची मुलगी समायरा दिसत आहे. रोहितची पत्नी रितिका मुलगी समायराला बुमराहच्या गोलंदाजी अ‌ॅक्शन करायला सांगते. तेव्हा समायरा बुमराहची अ‌ॅक्शन करुन दाखवते.

Jasprit Bumrah Shares Adorable Video Of Rohit Sharma's Daughter Trying To Copy His Action
रोहितची लाडकी लेक करतेय, बुमराहच्या बॉलिंग अ‌ॅक्शनची कॉपी, पाहा व्हिडिओ

By

Published : Apr 3, 2020, 4:31 PM IST

मुंबई- कोरोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशात खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करताना पाहायला मिळत आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माची मुलगी समायराने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजी अ‌ॅक्शन कॉपी केली. याचा व्हिडिओ खुद्द बुमराहने शेअर केला आहे.

बुमराहने शेअर केलेल्या व्हिडिओत, रोहित शर्मा आणि तिची मुलगी समायरा दिसत आहे. रोहितची पत्नी रितिका मुलगी समायराला बुमराहच्या गोलंदाजी अ‌ॅक्शन करायला सांगते. तेव्हा समायरा बुमराहची अ‌ॅक्शन करून दाखवते.

बुमराहने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. यात तो म्हणतो, 'समायरा माझ्यापेक्षा चांगली अ‌ॅक्शन करत आहे. मी तिचा चाहता बनलो आहे.

दरम्यान, याआधी शिखर धवनने पत्नी आयेशासोबत डान्स करताना व्हिडिओ शेअर केला आहे. यात शिखर-आयेशा 'ढल गया दिन, हो गई शाम' या गाण्यावर फिल्मी अंदाजात डान्स करतानाचा पाहायला मिळत आहे. व्हिडिओत शिखरने जितेंद्रच्या स्टाइलमध्ये कपडे घातले आहेत आणि आयशाने लीना चंदावरकर या अभिनेत्रीसारखा लुक केला आहे.

चीनमधील वुहान शहरातून पसरलेला कोरोना विषाणूचा फटका जगातील २०४ देशांना बसला आहे. जगभरातील देशांनी जारी केलेल्या आकडेवारी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या आकड्यांच्या आधारावर कोरोनामुळे आतापर्यंत ५३ हजार दोनशे ३८ जणांचा बळी गेला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या याचा संसर्ग झाला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या २ हजार पार झाली आहे.

हेही वाचा -लढा कोरोनाविरुद्धचा : मोदींनी विराट, सचिन, रोहित, गांगुलीसह क्रीडाविश्वाला मागितली मदत

हेही वाचा -VIDEO: ढल गया दिन, हो गई शाम..! पत्नीसोबत शिखर धवनचा डान्स

ABOUT THE AUTHOR

...view details