महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फलंदाजांनो सावधान...बुमराहने मोडलाय स्टम्प! - जसप्रीत बुमराह लेटेस्ट न्यूज

बुमराहने सरावसत्रात मोडलेल्या स्टम्पचा फोटो ट्विटरवर शेअर केला. आपल्या अचूक यॉर्करमुळे 'फंलदाजांची भंबेरी उडवणारा गोलंदाज', अशी बुमराहची ओळख असून तो संघात कधी परतेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दुखापतीमुळे बुमराह दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून बाहेर पडला होता. पुढील वर्षी होणाऱ्या न्यूझीलंड दौर्‍यावर तो संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

jasprit Bumrah shared the picture of broken stumps after practice
फलंदाजांनो सावधान...बुमराहने मोडलाय स्टम्प!

By

Published : Nov 26, 2019, 6:19 PM IST

मुंबई -वेगवान गोलंदाजांनी केलेल्या आक्रमक माऱ्यामुळे इडन गार्डन्सवर रंगलेल्या बांगलादेशविरूद्धच्या ऐतिहासिक कसोटीत टीम इंडियाला विजय मिळवता आला. दुखापतीमुळे बाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहला हा कसोटी सामना खेळता आला नव्हता. मात्र, तो आता पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. बुमराहने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक भन्नाट फोटो शेअर करत आपल्या परतीचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा -२६/११ दहशतवादी हल्ला : विराटसह 'या' क्रिकेटपटूंनी वाहिली शहिदांना आदरांजली

बुमराहने सरावसत्रात मोडलेल्या स्टम्पचा फोटो ट्विटरवर शेअर केला. आपल्या अचूक यॉर्करमुळे 'फंलदाजांची भंबेरी उडवणारा गोलंदाज', अशी बुमराहची ओळख असून तो संघात कधी परतेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दुखापतीमुळे बुमराह दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून बाहेर पडला होता. पुढील वर्षी होणाऱ्या न्यूझीलंड दौर्‍यावर तो संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत १२ गडी बाद केले. मोहम्मद शमीने ९ तर उमेश यादवने १२ बळी मिळवले आहेत. दिवस-रात्र कसोटीत ईशांत भारताकडून पहिला गडी, पहिले निर्धाव षटक आणि पहिला चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details