महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आकाश चोप्राच्या सर्वोत्कृष्ट टी-२० संघात ना विराट ना रोहित, पाकच्या आझमचा केला समावेश - रोहित शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याने जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा, एक टी-२० संघ निवडला आहे. त्याच्या संघात भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा यांचाही समावेश नाही. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मात्र, चोप्राच्या संघात आहे.

Jasprit Bumrah over Virat Kohli in Aakash Chopras World T20 XI
आकाश चोप्राच्या सर्वोत्कृष्ट टी-२० संघात ना विराट ना रोहित, पाकच्या आझमचा केला समावेश

By

Published : May 1, 2020, 5:38 PM IST

मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याने जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा, एक टी-२० संघ निवडला आहे. त्याच्या संघात भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा यांचाही समावेश नाही. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मात्र, चोप्राच्या संघात आहे. जसप्रीत बुमराहच्या रुपाने एकमेव भारतीय खेळाडू चोप्राच्या संघात आहे.

आकाश चोप्राने संघाची निवड केल्यानंतर सांगितले, 'आयसीसीने क्रिकेटप्रेमींना, तुमची बेस्ट टी-२० संघ निवडा असे सांगितले होते. यात आयसीसीने प्रत्येक संघातील एकच खेळाडू घेण्याची अट घातली होती. या पद्धतीनेच मी माझा संघ निवडला. पण या संघातील खेळाडूंची निवड करणे कठीण ठरले.'

आकाशने त्याच्या संघात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला सलामीवीर म्हणून घेतलं आहे. त्यासोबत इंग्लंडचा जोस बटलर आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी त्याने न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज कॉलिन मुन्रोला पसंती दिली. चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार आणि टी-२० क्रिकेटमधील अव्वल फलंदाज बाबर आझम आहे.

पाचव्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सची निवड चोप्राने केली आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू साकिब अल हसन सहाव्या स्थांनी आहे. फिरकीची जबाबदारी राशिद खान आणि नेपाळचा संदिप लामिछाने यांच्यावर आहे. तर वेगवान गोलंदाजीची धूरा भारताचा जसप्रीत बुमराह आणि श्रीलंकेचा लसिथ मलिंगा यांच्यावर आहे.

दरम्यान, प्रत्येक संघातील एकच खेळाडू निवडायचा असल्याने, आकाश चोप्राने विराट कोहली, रोहित शर्मा यांना त्याच्या संघात घेतलं नाही. त्याने भारतीय संघातून जसप्रीत बुमराहला निवडलं आहे.

हेही वाचा -लाजिरवाण्या खेळाडूंच्या इलेव्हनमध्ये अजित आगरकराचा समावेश; जाणकारांसह चाहते संतापले

हेही वाचा -ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियासह पाकिस्तानला दिला मोठा धक्का

ABOUT THE AUTHOR

...view details