लंडन- भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. दुखापतग्रस्त अष्टपैलू खेळाडू विजय शंकर ठीक असल्याची माहिती वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दिली आहे. सरावादरम्यान विजय शंकरला दुखापत झाली होती. यामुळे स्पर्धेमध्ये खेळणार की नाही यावर शंका उपस्थित झाली होती. मात्र, विजय शंकर ठीक असल्याचे बुमराहने स्पष्ट केलं आहे.
ICC WC २०१९ : भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी 'खुशखबर'; विजय शंकरची दुखापत गंभीर नाही - vijay shankar
दुखापतग्रस्त अष्टपैलू खेळाडू विजय शंकर ठीक असल्याची माहिती वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दिली आहे.
![ICC WC २०१९ : भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी 'खुशखबर'; विजय शंकरची दुखापत गंभीर नाही](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3617220-523-3617220-1561049311910.jpg)
बुधवारी सराव करताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा चेंडू विजय शंकर याच्या पायावर आदळला. यामुळे विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. यामुळे गुरुवारी विजय शंकरने सरावामध्ये भाग घेतला नाही. या कारणाने विजय शंकरची दुखापत गंभीर असल्याचे बोलले जात होते.
बुमराह याविषयी बोलताना म्हणाला की, आम्ही कोणत्याही फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने गोलंदाजी करत नाही. विजय शंकरला सरावादरम्यान चुकून चेंडू लागला. यह खेळाचा भाग आहे. मात्र, सद्या विजय शंकर ठीक असल्याचे त्यानं सांगितलं.