महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जसप्रीत बुमराह लग्न बंधनात अडकला, पाहा फोटो - जसप्रीत बुमराह-संजना गणेशन यांचे लग्न

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आज (१५ मार्च) स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.

जसप्रीत बुमराह लग्न बंधनात अडकला, पाहा फोटो
जसप्रीत बुमराह लग्न बंधनात अडकला, पाहा फोटो

By

Published : Mar 15, 2021, 4:08 PM IST

Updated : Mar 15, 2021, 4:27 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आज (१५ मार्च) स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंटद्वारे त्याने लग्नाची माहिती दिली आहे. त्याच्या लग्नातील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

जसप्रीतने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने, आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे. आम्ही लग्न केले हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

बुमराहला नविन इनिंगसाठी आयपीएलमधील संघ, मुंबई इंडियन्सने शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बीसीसीआयनं बुमराहने केलेल्या ट्विटला रिट्विट करत, या सुंदर प्रवासासाठी खूप सारं अभिनंदन. तुम्हा दोघांना आयुष्यभर आनंद मिळो, या शुभेच्छा, असे म्हटलं आहे. याशिवाय बुमराहला टीम इंडियातील सहकाऱ्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

कोण आहे संजना गणेशन -

संजना गणेशनने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे. यासोबत तिने मॉडेलिंगमध्ये देखील आपले नशिब आजमवलं आहे. तसेच तिनं रिअॅलटी शोमध्ये देखील आपला सहभाग नोंदवला आहे. सद्या ती स्पोर्टस अँकरीगचे काम करते. संजना गणेशनने अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिने २०१९ च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केले होते.

बुमराहपेक्षा त्याची पत्नी संजना वयाने आहे मोठी -

बुमराहची पत्नी संजना, ही बुमराहपेक्षा वयाने मोठी आहे. संजनाचा जन्म ६ मे १९९१ ला पुणे येथे झाला. तर बुमराहचा जन्म हा ६ डिसेंबर १९९३ ला झाला. यावरुन संजना ही बुमराहपेक्षा अडीच वर्षांनी मोठी आहे.

हेही वाचा -'ओए चारही बाजूला फिर आणि सर्वांना बॅट दाखव', किशनने सांगितला मैदानावरील किस्सा

हेही वाचा -भावा जिंकलस! इशानने सामनावीरचा पुरस्कार 'या' व्यक्तीला केला समर्पित

Last Updated : Mar 15, 2021, 4:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details