महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२० : बुमराह जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज; इंग्लंडच्या 'या' दिग्गजाकडून कौतुक

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने, जसप्रीत बुमराह सद्यघडीला जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असल्याचे म्हटलं आहे.

Jasprit Bumrah is Best Seam Bowler in World Currently: Michael Vaughan
IPL २०२० : बुमराह जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज; इंग्लंडच्या 'या' दिग्गजाकडून कौतुक

By

Published : Nov 7, 2020, 6:52 PM IST

दुबई - जसप्रीत बुमराहने आयपीएलच्या तेराव्या हंगामात, फलंदाजांना 'सळो की पळो' करून सोडले आहे. त्याच्या अचूक गोलंदाजीपुढे अनेक दिग्गज फलंदाजांनी नांगी टाकली आहे. त्याने दिल्लीविरुद्ध आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली आणि या क्षणी तो या लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडूही ठरला आहे. दिल्लीविरुद्ध त्याने ४ विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यान, बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने केले आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाला की, बुमराह जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. बुमराहने दिल्लीविरूद्ध केलेल्या कामगिरीनंतर त्याने हे मत मांडलं आहे. बुमराहच्या गोलंदाजीमुळे मुंबईने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

काय आहेवॉनचेम्हणणे...

मला असे म्हणायला काही हरकत नाही की, तो या क्षणी जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. शेवटच्या तीन सामन्यात त्याने १० विकेट घेत ४५ धावा दिल्या. टी-२० क्रिकेटमध्ये अशी गोलदांजी पाहायला मिळत नाही. त्याची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की तो थांबतो आणि शेवटच्या क्षणी बॉल फेकतो. त्याने स्टॉयनिसला बाद केलेला चेंडू खूप वेगवान होता आणि काही समजण्याआधी तो बॉल वेगाने आला, असे देखील वॉनने सांगितलं.

आयपीएल २०२० मध्ये बुमराहची कामगिरी

जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२० च्या हंगामात आतापर्यंत एकूण १४ सामने खेळली आहेत. यात त्याने २७ गडी बाद केले आहेत.

हेही वाचा -यॉर्करने डिव्हिलियर्सच्या दांड्या गुल करणारा नटराजन बनला 'बाबा', क्वालिफायर सामन्याआधी आली गोड बातमी

हेही वाचा -IPL बक्षीस रकमेत कपात; विजेत्या संघाला ट्रॉफीसह मिळणार 'इतके' कोटी रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details