नवी दिल्ली - एकेकाळी टीम इंडिया गोलंदाजीमुळे चिंतेत असे. मात्र, आता ती परिस्थिती बदलली आहे. आता टीम इंडियात दर्जेदार गोलंदाजांचा भरणा असून हे गोलंदाज कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे पलटवू शकतात. प्रामुख्याने जसप्रीत बुमराह तर टीम इंडियाचा हुकमी 'एक्का' ठरलेला आहे. त्याची भेदक गोलंदाजी विरोधी फलंदाजीसाठी कर्दनकाळ बनलेली आहे.
२५ वर्षीय जसप्रीत बुमराहने अल्पावधीत उल्लेखनीय कामगिरी करत जगभरात नाव कमावले आहे. सद्यस्थितीत तो आयसीसीच्या एकदिवसीय रॅकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर आहे, तर कसोटी रॅकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे, असे घवघवीत यश संपादित असतानाही एक आश्चर्यचकित बाब बुमराहच्या बाबतीत दिसून येते.
हेही वाचा -'कोण है रे ये? कहा से पकड लाते है', गांगुली जेव्हा भरमैदानात 'या' खेळाडूवर भडकतो