अँटिग्वा -विंडिजविरुद्ध टीम इंडिया आपला पहिला कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताने ३ बाद १८३ धावांची मजल मारली. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे विंडिजचा पहिला डाव २२२ धावांत आटोपला. यादरम्यान, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने फक्त एक बळी मिळवत मोठा विक्रम रचला आहे.
भारताच्या जसप्रीत बुमराहने कसोटीत साकारले सर्वात जलद 'अर्धशतक'
या सामन्यात खेळताना बुमराहने कसोटीतील बळींचे सर्वात जलद अर्धशतक साकारले आहे. सर्वात जलद ५० बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बुमराह अव्वल स्थानावर पोहचला आहे. त्याने ११ व्या सामन्यातच ही कामगिरी करुन दाखवली. बुमराहनंतर वेंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी यांचा क्रमांक लागतो. या दोघांनी १३ सामन्यांत ही कामगिरी केली होती.
या सामन्यात खेळताना बुमराहने कसोटीतील बळींचे सर्वात जलद अर्धशतक साकारले आहे. सर्वात जलद ५० बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बुमराह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याने ११ व्या सामन्यातच ही कामगिरी करुन दाखवली. बुमराहनंतर वेंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी यांचा क्रमांक लागतो. या दोघांनी १३ सामन्यांत ही कामगिरी केली होती.
विंडीजच्या पहिल्या डावात बुमराहने डॅरेन ब्राव्होला बाद केले होते. भारताच्या दुसऱ्या डावाला कर्णधार विराट आणि रहाणेने आकार दिला आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या १०४ धावांच्या भागिदारीच्या जोरावर भारताने सामन्यावर आपली पकड बनवली आहे. खेळ संपेपर्यंत विराट कोहली १११ चेंडूत ५० धावा आणि रहाणे १४० चेंडूत ५३ धावांवर खेळत होता. २६० धावांची आघाडी घेतल्याने भारत सुस्थितीत आहे.