मेलबर्न - भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी यजमान ऑस्ट्रेलिया संघाला एक जबर झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला दुखापत झाली आहे. यामुळे तो तिसरी कसोटी खेळणार नाही.
जेम्स पॅटिन्सन तिसऱ्या कसोटी सामन्याआधी त्याच्या घरी सुट्टीसाठी गेला होता. तिथे घरात तो पाय घसरून पडला. यात त्याच्या पायाला दुखापत झाली. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अद्याप पॅटिन्सनच्या जागेवर दुसऱ्या खेळाडूची घोषणा केलेली नाही.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पॅटिन्सनचा समावेश ऑस्ट्रेलिया संघात करण्यात आला होता. पण त्याला पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते. कारण ऑस्ट्रेलियाचे वेगवान तिकडी पॅट कमिंन्स, जोश हेजलवूड आणि मिशेल स्टार्क फॉर्मात आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील पॅटिन्सनला अंतिम स्थान मिळण्याची शक्यता कमीच होती.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा स्वॉडमध्ये वेगवान गोलंदाज मायकल नेसर आणि सीन अबॉटचा समावेश आहे. अशात चौथ्या कसोटीसाठी जर गरज भासल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया या दोघांचा विचार करू शकते.