अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना मोटेराच्या सरदार पटेल स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन एक खास विक्रमाची नोंद करू शकतो. अँडरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०० विकेट्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी २ विकेटची आवश्यकता आहे. तो या सामन्यात २ गडी बाद करत हा टप्पा पार करू शकतो.
अँडरसनने जर अहमदाबाद कसोटीत दोन विकेट घेत ९०० विकेटचा टप्पा पार केला तर तो अशी कामगिरी करणारा जगातील सहावा तर इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०० विकेट घेणारे गोलंदाज
- मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - १३४७ विकेट
- शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - १००१ विकेट
- अनिल कुंबळे (भारत) - ९५६ विकेट
- ग्लेन मॅग्राथ (ऑस्ट्रेलिया) - ९४९ विकेट
- वसीम अक्रम (पाकिस्तान) - ९१६ विकेट
- जेम्स अँडरसन (इंग्लंड) - ८९८ विकेट*