सेंचुरियन -दक्षिण आफ्रिकेविरूद्ध गुरूवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज मोठा विक्रम नोंदवणार आहे. अँडरसनचा समावेश १५० कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत होणार आहे. गुरुवारी सुपरस्टोर्ट पार्क मैदानावर यजमान दक्षिण आफ्रिकेपासून सुरू होणाऱ्या कसोटीत भाग घेऊन तो ही कामगिरी करेल.
हेही वाचा -अश्विनने केला असा 'कारनामा' जो दशकात कोणाला जमला नाही..
त्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, भारताचा सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ यासारख्या खेळाडूंनी या यादीत स्थान मिळवले आहे. हा मैलाचा दगड गाठणारा करणारा अँडरसन हा नववा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरेल. अँडरसनने अॅशेस मालिकेत शेवटची कसोटी खेळली होती, परंतु त्यानंतर तो जखमी झाला. आता खूप कालावधीनंतर, तो कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.
अँडरसनने वयाच्या २० व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०२१ च्या अॅशेस मालिकेपर्यंत खेळत राहू इच्छित असल्याचे त्याने यापूर्वी म्हटले आहे. 'मला अजूनही खेळायचे आहे आणि म्हणूनच पुनरागमन करण्यासाठी मी कठोर परिश्रम करीत आहे. मला ते आवडते आणि मला अजून देण्यास अजून खूप काही आहे. त्यामुळे परत येण्याची भूक अजून पुरेशी आहे', असे अँडरसनने म्हटले आहे.