महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

घरात 'फिट' राहण्यासाठी अँडरसनने शोधला खास उपाय...पाहा व्हिडिओ - जेम्स अँडरसन लेटेस्ट व्हिडिओ न्यूज

अँडरसनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तो तो आपल्या मुलीसह 'बेंच प्रेस' व्यायाम करताना दिसत आहे. 'मुली माझ्या व्यायामात मदत करत असल्याने आनंदी आहेत', असे अँडरसनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

James Anderson finds a method to stay fit at home
घरात 'फिट' राहण्यासाठी अँडरसनने शोधला खास उपाय...पाहा व्हिडिओ

By

Published : Mar 20, 2020, 12:10 PM IST

लंडन - कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धांवर टांगती तलवार आहे. त्यामुळे अनेक क्रीडापटू घरातच वेळ घालवण्यात व्यस्त आहेत. अशातच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननेही घरी तंदुरुस्त कसे रहायचे, यावर उपाय शोधला आहे.

हेही वाचा -BCCI ला आली धोनीची आठवण, शेअर केला खास फोटो

अँडरसनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तो तो आपल्या मुलीसह 'बेंच प्रेस' व्यायाम करताना दिसत आहे. 'मुली माझ्या व्यायामात मदत करत असल्याने आनंदी आहेत', असे अँडरसनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १० हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये या विषाणूचा फैलाव झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details