मुंबई- वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने, कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील जमैका थलायव्हास फ्रँचायझीवर गंभीर आरोप केले आहेत. मी संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. पण, जमैका फ्रँचायझीची वागणूक पाहून मला नेहमी, प्रथम श्रेणीतील खेळाडू असल्यासारखे वाटते, असे रसेलने म्हटलं आहे.
रसेलने एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना थलायव्हास संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ मिलर आणि मालक क्रिश पेर्सोद यांच्यावर टीका केली. तो म्हणाला, मी असा खेळाडू आहे जो जिंकण्यासाठी खेळतो आणि मी १३ टी-२० खिताब जिंकली आहेत. मी हरण्यासाठी खेळू इच्छित नाही. मी दोस्ती करताना विश्वास ठेवतो. पण थलायव्हास मला बहुतेक पसंत करत नाही. कारण आपण संघात कोणाला कायम राखणार आहोत? कोणाला नव्याने संघात घेणार आहोत? माझ्या या प्रश्नांचे उत्तर मला कधीच व्यवस्थापनाकडून मिळाले नाही. संघात संवादच होत नाही. त्यामुळे या संघाकडून माझे हे अखेरचे सत्र असू शकते.'
मी कोणी नवखा खेळाडू नाही. पण मला थलायव्हासची वागणूक पाहिल्यास प्रथम श्रेणीतील खेळाडू असल्यासारखे वाटते. तुमच्या मताला काहीच किंमत नसते. मला अशी वागणुक दिली जाते. मी संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. त्यामुळे फ्रँचायझीची विचारधारा काय आहे आणि ते कसे काम करते, हे मला चांगलंच माहित असल्याचेही रसेल म्हणाला.