मुंबई -ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ १-० ने पिछाडीवर आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने हा सामना ८ गडी राखून जिंकला. या मालिकेतील तीन सामने अद्याप बाकी आहेत. २६ डिसेंबरपासून दुसऱ्या सामन्याला सुरूवात होणार आहे. बॉक्सिंग डे चा हा सामना असून या सामन्याआधी भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने टीम इंडियाला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्यासह फलंदाजांनी बचावात्मक फलंदाजी टाळावी, असे तेंडुलकरने सुचवले आहे.
पहिल्या सामन्यातील पराभवावर काय म्हणाला सचिन
भारतीय संघाने फेब्रुवारी महिन्यानंतर कसोटी सामना खेळलेला नव्हता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने आधी टी-२० त्यानंतर एकदिवसीय आणि मग कसोटी मालिका खेळायला हवी होती. यामुळे भारताला कसोटीची तयारी करण्यासाठी योग्य दिशा मिळाली असती. असे असले तरी भारतीय संघाने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला १९१ धावांवर रोखले. यात देखील ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने महत्वपूर्ण धावा जोडल्या. जर आपल्याला पहिल्या डावात ९० ते १०० धावांची लीड मिळाली असती. तर वेगळा विचार करता आला असता. मात्र पहिल्या डावातील फलंदाजीची पुनरावृत्ती करण्यात आपण अपयशी ठरलो. भारतीय फलंदाजांमध्ये स्पष्टपणे फुटवर्कचा अभाव दिसून आला. ते फ्रंटफुटवर खेळण्याऐवजी क्रीज मध्येच थांबून खेळणे पसंत करत होते. या बचावात्मक पवित्र्यामुळेच नुकसान झाले, असे सांगत सचिनने दुसर्या सामन्यात या चुकांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले.
सचिनचा सल्ला