नवी दिल्ली - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणातालिकेत अव्वलस्थानी विराजमान असलेल्या टीम इंडियाचा मायदेशात पराभव करणे, मुश्किलही नही नामुमकिन असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. कारण टीम इंडियाने आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेसह मायदेशात तब्बल ११ कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. २०१२-१३ पासून टीम इंडियाने मालिका विजयाची लय कायम राखली आहे. यासह टीम इंडियाने मायदेशात फेब्रुवारी २०१० नंतर तब्बल ३४ कसोटी सामने जिंकले आहेत.
फेब्रुवारी २०१० नंतर आफ्रिकेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटीपर्यंत टीम इंडियाने एकूण ४६ कसोटी सामने खेळले आहेत. यात ३४ सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर ९ सामने ड्रॉ राहिले आहेत. महत्वाचे म्हणजे, टीम इंडियाला फक्त ३ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. या आकडेवारीवरुन टीम इंडिया मायदेशात सरस असल्याचे दिसून येते.