मेलबर्न -ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या कोचिंगवर संघातील काही वरिष्ठ खेळाडू तसेच कोचिंग स्टाप नाराज आहे. याविषयी लँगर यांना कळाले. तेव्हा त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
लँगर यांनी एका संकेतस्थळाशी बोलताना सांगितलं की, 'संघातील खेळाडू आणि कोंचिग स्टाप माझ्यावर नाराज असल्याचे मला कळाले. तेव्हा मला याचं खूप दु:ख वाटलं. खेळाडूंना काही त्रास होत असेल तर त्यांनी माझ्याशी व्यक्तिगत चर्चा करायला हवी होती.'
मी अनेक वर्षांपासून इमानदारीनं काम केलं आहे. नाराजीची चर्चा भारताविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर सुरू झाली. जर काही अडचण होती तर खेळाडू तसेच कोचिंग स्टापने मला याबद्दल सांगायला हवं होतं, असे देखील लँगर म्हणाले.