नवी दिल्ली - पारल रॉक्स आणि नेल्सन मंडेला बे जायंट्स यांच्यात रविवारी झालेल्या मॅझन्सी सुपर लीगमधील सामन्यात इसरु उडानाने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. या सामन्यात उदानाने नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या दुखापतग्रस्त फलंदाजाला धावबाद न करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा -चाहत्यांसाठी खुशखबर!... परत टीव्हीवर दिसणार धोनी!
त्याचे झाले असे, जायंट्सचा मधल्या फळीतील फलंदाज हीनो कुहन याने मारलेला उदानाच्या गोलंदाजीवरील चेंडू नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या मार्को माराइसला लागला. हा चेंडू मार्कोला जोरात लागला आणि त्याला लागून चेंडू सरळ उदानाच्या हातात गेला. क्रीजच्या बाहेर असलेला मार्को या चेंडूमुळे तात्काळ जमिनीवर कोसळला. मात्र, उदानाने मार्कोची परिस्थिती पाहता त्याला धावबाद न करण्याचा निर्णय घेतला.
उदानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून जगभरात त्याचे कौतुक होत आहे.