कोलकाता - बंगालचा कर्णधार आणि भारताच्या ‘अ’ संघाचा सलामीवीर अभिमन्यु ईश्वरन याने देहरादून येथे स्थलांतरित मजुरांना मदत करण्यासाठी पोलिसांना अडीच लाख रुपयांची मदत दिली आहे. ईश्वरनने निवेदनात म्हटले आहे, की या कठीण काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत केली पाहिजे. देहरादूनमध्ये तेथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना मदत करण्यासाठी मी पोलिसांना अडीच लाख रुपये दिले आहेत.
कोरोना युद्ध : बंगालच्या कर्णधाराने दिली अडीच लाखाची मदत - abhimanyu easwaran 2.5 lakh donation news
२४ वर्षांच्या ईश्वरनने सांगितले, की मी १००हून अधिक कुटुंबांना अन्न आणि रेशन देण्याचे कामदेखील करीत आहे. तो म्हणाला, “ही मदत फारशी नाही. परंतु या मदतीमुळे आम्ही आनंदी आहोत”
कोरोना युद्ध : बंगालच्या कर्णधाराने दिली अडीच लाखाची मदत
२४ वर्षांच्या ईश्वरनने सांगितले, की मी १००हून अधिक कुटुंबांना अन्न आणि रेशन देण्याचे कामदेखील करीत आहे. तो म्हणाला, “ही मदत फारशी नाही. परंतु या मदतीमुळे आम्ही आनंदी आहोत”
ईश्वरनच्या नेतृत्वात बंगालने या मोसमात रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, त्यांना अंतिम सामन्यात सौराष्ट्रकडून पराभव स्विकारावा लागला.
Last Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST