महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अखेर 'तो' विक्रम इशांतने मोडलाच! - कपिल देव

इशांत आता कसोटी क्रिकेटमध्ये आशिया खंडाबाहेर सर्वाधिक बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी कपिल देव यांच्या नावावर ४५ कसोटी सामन्यात १५५ विकेट्स जमा आहेत. तर, इशांतने विंडीजविरुद्धच्या सामन्यात क्रेग ब्रेथवेटला माघारी धाडत आपला १५६ वा बळी घेतला. त्याने ही कामगिरी ४६ कसोटींत केली आहे.

अखेर 'तो' विक्रम इशांतने मोडलाच!

By

Published : Sep 2, 2019, 11:37 AM IST

किंग्स्टन -टीम इंडियाच्या विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन विक्रम पाहायला मिळाले. एकीकडे शतकवीर हनुमा विहारीने मास्टर ब्लास्टर सचिनच्या एका विक्रमाची बरोबरी केली. तर, दुसरीकडे वेगवान गोलंदाज इशांत शर्माने भारताचा माजी कर्णधार कपिल देवचा खास विक्रम मोडित काढला.

हेही वाचा -राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप : महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेने मोडला स्वत:चाच विक्रम

इशांत आता कसोटी क्रिकेटमध्ये आशिया खंडाबाहेर सर्वाधिक बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी कपिल देव यांच्या नावावर ४५ कसोटी सामन्यात १५५ विकेट्स जमा आहेत. तर, इशांतने विंडीजविरुद्धच्या सामन्यात क्रेग ब्रेथवेटला माघारी धाडत आपला १५६ वा बळी घेतला. त्याने ही कामगिरी ४६ कसोटींत केली आहे.

या विक्रमामध्ये पहिल्या क्रमांकावर भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे विराजमान आहे. त्याने ५० कसोटी सामन्यांत २०० बळी घेतले आहेत. इशांतनंतर भारताचा माजी गोलंदाज झहीर खानचा क्रमांक लागतो. झहीरच्या खात्यावर ३८ कसोटीत १४७ बळी आहेत.

हनुमा विहारीचा विक्रम -

आपले पहिले कसोटी शतक झळकावणाऱ्या विहारीने क्रिकेटच्या देवाच्या एका विक्रमाची बरोबरी केली. हनुमा विहारीने दुसऱ्या डावात नाबाद ५३ तर, पहिल्या डावातही हनुमा विहारीने १११ धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन एका डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणारा विहारी दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकरने इंग्लंडविरुद्ध १९९० साली मँचेस्टर कसोटीत अशी कामगिरी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details