नवी दिल्ली -यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासह २९ खेळाडूंच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. या खेळाडूंपैकी विजेत्यांची निवड केली जाईल. या खेळाडूंच्या निवडीसाठी १२ सदस्यीय निवड समितीची बैठक घेण्यात आली. सोमवारी द्रोणाचार्य आणि ध्यानचंद तर, मंगळवारी समितीने राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांची नावे जाहीर केली.
इशांत शर्मा व्यतिरिक्त अतानू दास, दीपिका ठाकूर, दीपक हुडा, दिविज शरण, मीराबाई चानू, साक्षी मलिक आणि तीन पॅरालिम्पियन खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रेंकीरेड्डी या जोडीचीही या पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे.