मुंबई -इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोघांची भारतीय टी-२० संघात थाटात एन्ट्री झाली. इशानने पदार्पणाच्या सामन्यात ३२ चेंडूत ५६ धावांची खेळी साकारली. तर सूर्यकुमारने ३१ चेंडूत ५७ धावांची वादळी खेळी केली. आता भारताच्या माजी दिग्गजाने, हे दोघे यावर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या भारतीय संघात स्थान मिळवण्याचे हकदार आहेत, असे म्हटलं आहे.
भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने आपले मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला, की 'इशान आणि सूर्यकुमार यांनी पदार्पणाच्या सामन्यात जी खेळी केली. ती पाहता, ते भारताच्या टी-२० विश्वकरंडक संघात असतील. ही कठीण निवड आहे. पण दोघे विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवण्यास हकदार आहेत.'