नवी दिल्ली - भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय सर्व क्रिकेटच्या प्रकारांमधून निवृत्ती पत्करली आहे. इरफानने २००३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, तो २००६ मध्ये पाकिस्तान दौऱ्यात चर्चेत आला होता.
इरफान पठाणने २००६ मध्ये पाकिस्तानात हॅट्ट्रिक साधली होती. कराची येथे झालेल्या कसोटीत त्याने पाकिस्तान विरुद्ध खेळताना हा कारनामा केला होता. या कामगिरीसह तो कसोटीत हरभजन सिंगनंतर हॅट्ट्रिक घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला.
तसेच इरफानने २००७ साली झालेल्या टी-२० विश्व करंडक स्पर्धेत मोलाची भूमिका पार पाडली होती. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरीच्या जोरावर सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.