लॉर्ड्स - विश्वकरंडक विजेत्या इंग्लंडने परत एकदा लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इतिहास घडवला. पहिल्या डावात अवघ्या ८५ धावांवर बाद करणाऱ्या आयर्लंडला इंग्लंडने 38 धावांत गुंडाळत १४३ धावांनी हा सामना जिंकला. इंग्लंडकडून वोक्सने १७ धावांत ६, तर ब्रॉडने १९ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
आयर्लंडला ३८ धावांत गुंडाळत इंग्लंडने निच्चांकी धावांचा कलंक पुसला - lowest test innings
इंग्लंडकडून वोक्सने १७ धावांत ६, तर ब्रॉडने १९ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
इंग्लंडचे 182 धावांचे लक्ष्य गाठून आयर्लंडला ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी होती. मात्र आयर्लंडच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करली. पहिल्या डावात आयर्लंडने 207 धावा करत आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या डावात जॅक लीच ( 92), जेसन रॉय ( 72) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने 303 धावा करत दमदार पुनरागमन केले होते.
या सामन्यात आयर्लंडच्या टीम मुर्ताघने पहिल्या डावात इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला. त्याने रोरी बर्न्स, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, ख्रिस वोक्स या फलंदाजांना माघारी धाडले. टीमने ९ षटके टाकत अवघ्या १३ धावा दिल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या आयर्लंडकडून अँडी बॅलबर्नीनं ( 55) चांगला खेळ केला. आयर्लंडने 207 धावा करत 122 धावांची आघाडी घेतली होती.