डब्लिन - पुढील वर्षी जानेवारीत यूएई आणि अफगाणिस्तान यांच्यासह खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी आयर्लंडने १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अफगाणिस्तानसह होणारी एकदिवसीय मालिका वर्ल्डकप सुपर लीगचा एक भाग आहे.
हेही वाचा -खुशखबर!...रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास
यावर्षी ऑगस्टमध्ये आयर्लंडने इंग्लंडविरुद्ध सामना खेळला होता. या सामन्यात त्यांनी शानदार विजय नोंदवला. यानंतर आयरिश संघ आता जानेवारीमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे. क्रिकेट आयर्लंडने म्हटले आहे की, या संघात समाविष्ट नसलेले खेळाडू कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत त्यांच्या घरी राहतील, जेणेकरून त्यांना गरज भासल्यास मालिकेसाठी अबुधाबी येथे बोलावले जाईल.
आयरिश संघाने २०२०मध्ये केवळ १२ सामने खेळले आहेत. या संघात बर्यापैकी सुधारणा झाली असल्याचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम फोर्ड सांगितले आहे.
आयर्लंड संघ : अँड्र्यू बाल्बर्नी (कर्णधार), मार्क अडेयर, कर्टिस केम्फर, डेव्हिड डेलानी, गॅरेथ डेलानी, जोश लिटल, अँड्र्यू मॅकब्राईन, बॅरी मॅक्कार्थी, जेम्स मॅकलम, केव्हिन ओब्रायन, नील रॉक, सिमी सिंग, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉरकन टकर, क्रेग यंग.