नवी दिल्ली - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपला गुरू लसिथ मलिंगाला यशस्वी फ्रेंचायझी क्रिकेट कारकिर्दीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. आता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पूर्वीसारखे असणार नाही, असे बुमराह म्हणाला. यंदाच्या आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने लसिथ मलिंगाला रिलिज केले. त्यानंतर मलिंगाने फ्रेंचायझी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - जुव्हेंटसच्या विजयासोबत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विश्वविक्रम
बुमराह आणि मलिंगा दोघेही मुंबई इंडियन्स संघात एकत्र खेळत होते. बुमराहच्या जडणघडणीच्या कालावधीत मलिंगाने त्याला खूप मार्गदर्शन केले. मलिंगाबरोबर खेळणे ही अभिमानाची बाब असल्याचे बुमराहने सांगितले. बुमराह ट्विटरवर म्हणाला, "तुझ्याबरोबर खेळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी बर्याच वर्षांत तुमचे मन वाचले आहे. यशस्वी कारकीर्दीसाठी अभिनंदन. आता आयपीएल पूर्वीसारखी राहणार नाही."
संघाला दिलेल्या यादगार क्षणांबद्दल मुंबई इंडियन्सने मलिंगाचे आभार मानले आहेत. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या २०२१ च्या आवृत्तीसाठी मलिंगा, नॅथन कुल्टर-नाईल आणि जेम्स पॅटिन्सन यांच्यासह सात खेळाडूंना रिलिज केले आहे.
पाच वेळा विजेतेपद जिंकलेल्या मुंबई संघाकडे सध्या १८ ळाडू असून उर्वरित सात खेळाडूंची जागा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या लिलावात भरली जाणार आहे. पुढील हंगामासाठी मुंबई चार विदेशी खेळाडूंची निवड करू शकते.