महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

राजस्थानसमोर आज दिल्लीचे आव्हान, प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी रॉयल्सला विजय अनिवार्य - indian Premier League 2019

राजस्थानला ९ पैकी ६ सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्याने गुणतालिकेत ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर

राजस्थानसमोर आज दिल्लीचे आव्हान

By

Published : Apr 22, 2019, 1:04 PM IST

जयपूर -आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स सवाई मानसिंह मैदानावर रात्री ८ वाजता दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहेत. राजस्थान संघाने आपला कर्णधार बदलला असून अजिंक्य रहाणेएवजी स्टीव्ह स्मिथकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. मागच्या सामन्यात स्मिथच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानने मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव केला होता. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून रहायचे असल्यास पुढीस सर्व सामन्यात राजस्थानला विजय मिळवणे अनिवार्य आहे.


राजस्थानच्या फलंदाजीची जबाबदारी ही बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, जोस बटलर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यावर असेल. तर गोलंदाजीची प्रमुख जबाबदारी ही जोफ्रा आर्चर आणि धवल कुलकर्णीकडे असणार आहे.

प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी रॉयल्सला विजय अनिवार्य

आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये राजस्थानची फलंदाजी समाधानकारक झाली नसल्याने संघाला ९ पैकी ६ सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्याने गुणतालिकेत ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.


दिल्लीच्या फलंदाजीचा विचार केला तर, कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवन तुफान फॉर्मात आहेत. तर गोलंदाजीत कॅगिसो रबाडाची चांगली साथ मिळत असल्याने दिल्लीने आतापर्यंत ६ सामने जिंकून गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे. ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, आणि संदीप लामिछाने या युवा खेळाडूंकडूनही दिल्लीला चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे. आजचा सामना जिंकल्यास प्लेऑफमध्ये पोहचण्याचा दिल्लीचा मार्ग सुकर होणार आहे. गुणतालिकेत दिल्लीचा संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.


राजस्थान रॉयल्स - स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, कृष्णप्पा गॉथम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाळ, आर्यमान बिर्ला, एस मिथून, प्रशांत चोप्रा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोधी, जयदेव उनाडकट, वरुण ऍरॉन, ओशान थॉमस, शशांक सिंग, लियाम लिव्हिनस्टोन, शुभम राजाने, मनन वोहरा, ऍश्टन टर्नर, रियान पराग.


दिल्ली कॅपिटल्स -श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कॉलिन इन्ग्राम, मनजोत कालरा, पृथ्वी शॉ, शेरफाने रुदरफोर्ड, शिखर धवन, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, नाथू सिंग, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस, कॉलिन मुन्रो, हनुमा विहारी, जलाज सक्सेना, किमो पॉल, राहुल तेवतिया, अंकुश बेन्स, अमित मिश्रा, आवेश खान, बंडारु अयप्पा.

ABOUT THE AUTHOR

...view details